कागलमध्ये विकासकामांची चोरी करणारी टोळी कार्यरत आमदार हसन मुश्रीफ यांचा घणाघात : म्हाकवेत पाणी योजनेच्या खुदाईचा शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागलमध्ये विकासकामांची चोरी करणारी टोळी कार्यरत आमदार हसन मुश्रीफ यांचा घणाघात  : म्हाकवेत पाणी योजनेच्या खुदाईचा शुभारंभ
कागलमध्ये विकासकामांची चोरी करणारी टोळी कार्यरत आमदार हसन मुश्रीफ यांचा घणाघात : म्हाकवेत पाणी योजनेच्या खुदाईचा शुभारंभ

कागलमध्ये विकासकामांची चोरी करणारी टोळी कार्यरत आमदार हसन मुश्रीफ यांचा घणाघात : म्हाकवेत पाणी योजनेच्या खुदाईचा शुभारंभ

sakal_logo
By

04209

विकासकामांची चोरी करणारी
टोळी कागलमध्ये कार्यरत

आमदार मुश्रीफ; म्हाकवेत पाणी योजनेच्या खोदाईचा प्रारंभ

म्हाकवे, ता. ७ : कागल तालुक्यात विकासकामांची चोरी करणारी टोळी कार्यरत झाली आहे. कार्यकर्त्यांनी सावध राहावे. नियोनबध्द आराखडा तयार करून कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावली असताना सत्ता आल्याने उद्घाटने करून श्रेय लाटण्याचे उद्योग बंद करा, अशी टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.
म्हाकवे (ता. कागल) येथे जलजीवन पाणीपुरवठा योजनेतून चार कोटी ८४ लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन खोदाईप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य ए. वाय. पाटील-म्हाकवेकर होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘जे साधे ग्रामपंचायत सदस्यही नाहीत त्यांना विकासकामांची उद्घाटने करून श्रेय घेण्याची घाई झाली आहे. ३० वर्षात आपण केलेल्या कामामुळे जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले.’ रमेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सिद्राम गंगाधरे, नितीन पाटील, जी. एस. पाटील, सुनील पाटील, निवास पाटील, आकाराम पाटील, विलास पाटील, विश्वनाथ पाटील, एस. के. पाटील, जीवन कांबळे, विजय पाटील, चंद्रकांत कांबळे, अंजना पाटील, सुजाता कुंभारसह ग्रामस्थ उपस्थित होते. के. आर. पाटील यांनी आभार मानले.

चौकट -
आता लढाई अपरिपक्व व्यक्तीशी...
महाविकास आघाडीने मंजूर झालेल्या कामांचे उद्घाटन करणार, अशी वक्तव्ये कागलमधील काहीजण करत आहेत. राजकारणात प्रोटोकॉल असतात. याची जाणीवच नसणाऱ्या अपरिपक्व व्यक्तीशी लढावे लागणार आहे. कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहन आमदार मुश्रीफ यांनी केले.