सरकार जातीय सलोख्याला धक्का लावण्याचे काम करत आहे  विरोधी पक्षनेते अजित पवार: केनवडे प्राथमिक शाळेतील एक कोटी रुपयांच्या फ्युच्युरिस्टिक क्लासरूमचा लोकार्पण सोहळा संपन्न

सरकार जातीय सलोख्याला धक्का लावण्याचे काम करत आहे विरोधी पक्षनेते अजित पवार: केनवडे प्राथमिक शाळेतील एक कोटी रुपयांच्या फ्युच्युरिस्टिक क्लासरूमचा लोकार्पण सोहळा संपन्न

(छायाचित्र ः साताप्पा चव्हाण, बेनिक्रे)
04251, 04250

जातीय सलोख्याला धक्का
लावण्याचा सरकारचा प्रयत्न

अजित पवार ; केनवडेत फ्युच्युरिस्टिक क्लासरूमचे लोकार्पण

म्हाकवे, ता. १७ : सात महिन्यांपूर्वी आलेले सरकार जातीय सलोख्याला धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहे. तो प्रयत्न शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला परवडणारा नाही. सर्वांनी एकत्रितपणे एकमेकांना साथ द्यावी, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
केनवडे (ता. कागल) येथे प्राथमिक शाळेतील एक कोटीच्या फ्युच्युरिस्टिक क्लासरूमच्या लोकार्पणावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजय घाटगे उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, ‘डिजिटल क्रांतीमुळे विद्यार्थी स्मार्ट झाले आहेत. सोशल मीडियावरची माहिती खरी की खोटी याची शहानिशा करायला विद्यार्थ्यांनी शिकावे. खोटी माहिती फॉरवर्ड न करता खंडित करा. चुकीच्या माहितीमधून देशाची एकता, अखंडता बाधित होणार नाही याची काळजी घ्या. प्रोत्साहन अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी प्रयत्न करू."
माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, संताजी शुगरचे चेअरमन नविद मुश्रीफ, सरपंच अनुराधा शिंदे, उपसरपंच शुभांगी पाटील, पोलिसपाटील वंदना सुतार, शहाजी पाटील, उत्तम वाडकर, मुख्याध्यापक सुनील चौगुले उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक दत्ता पाटील-केनवडेकर यांनी केले.

चौकट
अशिक्षिताने उभारली डिजिटल शाळा
केनवडेचे माजी सरपंच दत्ता पाटील अशिक्षित आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळण्यासाठी एक कोटीची फ्युच्युरिस्टिक क्लासरूम उभारली क्लासरूमसाठी इमारतीचे बांधकाम ॲडव्हान्समध्ये करुन घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com