सावर्डे खुर्द येथे मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावर्डे खुर्द येथे मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा
सावर्डे खुर्द येथे मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा

सावर्डे खुर्द येथे मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा

sakal_logo
By

04312
मुश्रीफ फाउंडेशनतर्फे
सावर्डे खुर्दला टँकरने पाणी
म्हाकवे : सावर्डे खुर्दला (ता. कागल) पाणीपुरवठा करणारी बोअरवेल तांत्रिक अडचणीमुळे बंद पडल्याने ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी चार दिवसांपासून नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनतर्फे गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. नवीद मुश्रीफ यांनी याबाबत सुचना केली होती. येथील बोअरवेल नादुरुस्त झाल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सामाजिक कार्यकर्ते सागर मालवेकर यांनी गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांना सांगताच त्यांनी ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेत तत्काळ पिण्याच्या पाण्याची टँकरची सोय केली. यावेळी सागर मालवेकर, पांडुरंग कदम, केरबा पसारे, भैरू डाफळे, सखाराम मोगणे, रणजीत मालवेकर, नामदेव मालवेकर, शामराव मालवेकर, बाबूराव मालवेकर, संभाजी मालवेकर, महादेव मालवेकर, प्रवीण मालवेकर, नामदेव खंडागळे, रंगराव कांबळे, संजू मालवेकर, विजय मालवेकर उपस्थित होते.