Sun, May 28, 2023

सावर्डे बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताह
सावर्डे बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताह
Published on : 27 March 2023, 6:21 am
सावर्डे बुद्रुकला धार्मिक कार्यक्रम
म्हाकवे, ता. २७ : सावर्डे बुद्रुक (ता.कागल) येथे दि.३० मार्च ते ६ एप्रिल २०२३ या कालावधीत जगद्गुरु संत तुकाराम महाराज जीवनचरित्र सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत शोभा दिंडी, जगद्गुरु संत तुकाराम महाराज जीवनचरित्र, भजन, हरिपाठ, कीर्तन, पालखी दिंडी, महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.