मुश्रीफ वाढदिवस लेख... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुश्रीफ वाढदिवस लेख...
मुश्रीफ वाढदिवस लेख...

मुश्रीफ वाढदिवस लेख...

sakal_logo
By

आदर्श कार्याचा
मुश्रीफ वस्तुपाठ

आजचं राजकारण म्हणजे पद, प्रतिष्ठेचा खेळ आहे. जनतेला माय-बाप नव्हे, तर केवळ मतदार म्हणून वापरण्याची पद्धत सुरू झाली आहे; पण याच राजकारणात वावरणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांनी कार्यशैलीने राज्याला प्रभावित केले आहे. मंत्री कसा असावा याचा आदर्श वस्तूपाठ सर्वांसमोर ठेवताना आपण मंत्री नव्हे तर ‘जनतामंत्री’ आहोत हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. अशा कर्तबगार माजी ग्रामविकासमंत्री आमदार हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिवस..

आमदार हसन मुश्रीफ अदभूत व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या कामाची व्यापकता व विश्वासार्हता आचंबीत करणारी आहे. त्यांचा एक एक पैलू उलगडताना दिव्यत्वाची प्रचिती येते. कोणत्याही अडचणीत प्रत्येकाचा आधार, विकासाचा अखंड पाझर आणि प्रत्येकाच्या हृदयातील विश्वास म्हणून मुश्रीफ साहेबांच स्थान अढळ आहे. फक्त आमदार किंवा मंत्री म्हणून नव्हे तर एक जिवाभावाचा माणूस म्हणून त्यांनी एक वेगळं नातं निर्माण केलं आहे. राजकीय पातळीवर या सगळ्याचे मूल्यमापन होणे कठिण आहे. एखाद्याचं दु:ख पाहून भावूक होणारा हा हिमालय संवेदनशीलतेने काठोकाठ भरलेला जाणवतो. राजकारणाचा दर्जा कितीही खाली गेला असला तरी साहेबांच राजकारण मात्र समाजकारणानं भरलेल्या पवित्र कुंडासारखं आहे. आमदार, मंत्रीपद, जिल्हा बँकेचे चेअरमन पद किंवा त्यांच्या स्वतःच्या कारखान्याचे कामकाज असो या प्रत्येक ठिकाणी त्यांची एक वेगळी अशी छाप दिसून येते. ग्रामविकास मंत्री असतांना त्यांनी काही निर्णय घेतले. या निर्णयाचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक झाले विरोधी पक्षांनीही विधानसभेत या निर्णयांचे कौतुक केले. के.डी.सी.सी.बँकेच्या माध्यमातून मुश्रीफ साहेबांनी सहकारात आदर्श निर्माण केला आहे. महापूर आणि कोरोनाच्या
काळात तर त्यानी एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे जनतेची काळजी घेतली होती. या दोन्ही कठिण काळात त्यांच्या विशाल हृदयाची प्रचिती सर्वांनीच घेतली आहे. मळलेल्या वाटेने सगळेच जातात, मुश्रीफ साहेबांनी मात्र प्रत्येक ठिकाणी स्वत:ची वेगळी वाट निर्माण केल्याचे दिसते. ही वेगळी वाट निर्माण करण्याचे त्यांचे सामर्थ्य हे जनतेविषयी असणाऱ्या तळमळीतून आल्याचे जाणवते. तसं पाहिलं तर साहेबांमधील काही काळ सोडता सलगपणे अनेक वर्षे मंत्रीपदावर आहेत. पण आजही त्यांचे निवासस्थान हे कागलच्या एका बोळातच आहे. त्यांना कागलमध्ये भेटायला येणारे गोरगरीब लोक एस्.टी.ने येतात त्यांना फार चालायला लागू नये. साहेब त्यांना सहज उपलब्ध झाले पाहिजेत या एकाच भावनेने ते आजही एका छोट्याश्या बोळात राहत आहेत. साहेबांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यावेळी सांत्वनासाठी आलेले देशाचे नेते शरद पवार साहेबांनी मोठ्या आश्चर्याने विचारले होते की. "हसन इथं राहतोय" माननीय पवार साहेबांचं हे वाक्य खूप काही सांगणार आहे. मुश्रीफ साहेबांचा पोषाख ठरलेला. पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट, ठराविक कंपनीच्याच वाहना. ते कायमपणे याच गणवेशात दिसणार. कधीही कसलाही डामडौल नाही की मोठेपणाचा आब नाही. साधेपनाचं हे वैराग्य म्हणजे राजकारणातील एक दुर्मिळ उदाहरणच म्हणावे लागेल. कागल तालुक्यातील प्रत्येक गावात सुंदर रस्ते होत आहेत. कागल मधील घरकुल योजनेतून अनेकांना हक्काचे घर मिळाली आहेत. अनेक विकासकामांनी गावेच्या गावे सुंदर होतं आहेत. साहेबांचा हा विकास रथ म्हणजे एक स्वप्नवत प्रवास आहे. हा प्रवास असाच सुरू राहण्यासाठी साहेबांना उदंड निरोगी आयुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना व त्यांना वाढदिवसाच्या अंतःकरण पूर्वक शुभेच्छा..
04327
-सुभाष भोसले
माजी सरपंच, पिराचीवाडी ता.कागल.