
शासकीय योजनांची अंमलबजावणी, विकासकामात पारदर्शीपणा आणणार : राजे समरजितसिंह घाटगे : गलगले येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटप
04333
विकासकामांत पारदर्शीपणा आणणार
समरजितसिंह घाटगे; गलगलेत बांधकाम साहित्य वाटप
म्हाकवे, ता. ३० : कागल, गडहिंग्लज-उत्तूर विधानसभा मतदारसंघासाठी निधी उपलब्ध आहे. शासकीय योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. यामध्ये पारदर्शीपणा ठेवला जाईल, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. गलगले (ता. कागल) येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटपप्रसंगी ते बोलत होते.
श्री. घाटगे म्हणाले, ‘जिल्हा नियोजन समिती, सार्वजनिक बांधकाम, डोंगरी विकास अशा योजनांच्या माध्यमातून ३२ कोटींचा निधी कागल मतदारसंघासाठी आहे. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, बांधकाम कामगार या योजना लाभार्थीपर्यंत पोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. राज्य व केंद्र शासनाकडून विकासकामांसाठी आणखी निधी खेचून आणला जाईल.’
विश्वनाथ पाटील यांनी स्वागत केले. किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील, दत्तात्रय पाटील, उत्तम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, दत्तामामा खराडे, वाय. टी. पाटील, संजय बरकाळे, राजाराम डावरे, शंकर पाटील, शशिकांत डावरे, विजय जाधव, महादेव पडळकर उपस्थित होते. प्रकाश डावरे यांनी आभार मानले.
चौकट -
बचत गटांसाठी हक्काचे व्यासपीठ
शाहू दूध संघाच्या शॉपींची संख्या वाढविण्यात येणार आहे. शॉपीमध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येतील. महिलांनी नवोदिता घाटगे यांच्या उपक्रमाचा स्वावलंबनासाठी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन श्री. घाटगे यांनी केले.