संजयबाबा घाटगे वाढदिवस लेख...  संघर्षमय नेतृत्व : संजयबाबा घाटगे

संजयबाबा घाटगे वाढदिवस लेख... संघर्षमय नेतृत्व : संजयबाबा घाटगे

04386
संघर्षमय नेतृत्व
आयुष्यभर ज्यांनी राजकीय, सामाजिक संघर्ष केला. संघर्षात सकारात्मक विचारानेच लढणारा नेता म्हणजे माजी आमदार संजयबाबा घाटगे होय. सामान्य जनतेच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणारे असामान्य नेतृत्व म्हणून संजयबाबा घाटगे यांच्याकडे पहावे लागेल. आयुष्यभर संघर्ष आणि संघर्षच त्यांच्या वाट्याला आला. कुठलीही मोठी राजकीय सत्ता नसताना संजयबाबा घाटगे यांनी शाश्‍वत राजकीय वलय निमार्ण केले. त्यामुळे संघर्ष आणि संजयबाबा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
देशसेवा करणाऱ्या आर्मी अधिका-याच्या कुटूंबात संजयबाबा घाटगे यांचा जन्म झाला. मनात आले असते तर ते आपले आयुष्य फार सुखात जगू शकले असते. परंतू व्हनाळी या आपल्या मुळ गावी लोकांच्या हालअपेष्ठा, दु:ख, दारिद्रय पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या इच्छा-आकांक्षावर पाणी ओतून येथील लोकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी देण्यासाठी प्राधान्य दिले. लोकांच्या विकासाचा विचार करून संजयबाबांसारखा उमदा तरूण त्याकाळी शहरातील आणि घरातील सर्व सुखसोयी सोडून व्हनाळी (ता.कागल) सारख्या खेडेगावात रहायला आले. येथूनच त्यांच्या संघर्षमय पर्वाची सुरूवात झाली. गावी आल्यानंतर संजयबाबांनी ग्रामस्थांचे जीवन समजावून घेतले. त्यामुळेच संजयबाबांची नाळ सर्वसामान्यांशी घट्ट जुळली आहे.
संजयबाबा पंचायत समितीचे सभापती असताना ख-या आर्थाने शासनाच्या विविध योजना वाड्या वसत्यांवर पोहचवल्या. त्यामुळे संजयबाबा गावात आले की घरातीलच सदस्यच आल्याची भावना त्या काळी लोकांमध्ये होती. १९९८ मध्ये ते पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून आले. १३ महिन्यांच्या काळात नागणवाडी प्रकल्प, कागल एसटी बसस्थानक अशी कामे केली. यानंतर स्वकियानीच घात केल्याने राजकीय शत्रूंविरूद्ध लढताना संजयबाबांना पराकोटीचा संघर्ष सोसावा लागला. राजकारणात वेगळी छाप पाडणारे संघर्षमय, अशा असामान्य नेतृत्वास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा... त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना......
------

सर्व काही शेतकऱ्यांसाठी....
शेतक-यांचे कोटकल्याण करण्यासाठी त्यांनी व्हनाळी, साके ,केनवडे गोरंबे या पांढ-या पट्ट्यातील सुमारे पाच हजार कमांड यरिया असलेल्या शेतीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी पाणीपुरवठा संस्था उभी केली. जिद्दी संजयबाबांनी अन्नपुर्णा पाणीपुरवठा योजना पुर्ण करून पाच सहा गावातील लोकांचे पिढ्याण-पिढ्याचे कोटकल्याण केले. तर सामाजिक बांधिलकी म्हणून कर्नाटकातील हदनाळ गावाला पाणी देवून सुजलाम -सुफलाम केले. त्यामुळेच या योजनेला राज्यसरकारने आदर्श संस्था म्हणून पुरस्कार देवून गैारव केला. संस्थेला अन्य पुरस्कार मिळाले आहेत. योजनेपुर्वी या गावातील लोक सांगली, कर्नाटकात ऊस तोडण्यासाठी जात होते. अन्नपूर्णा योजनेनंतर संजयबाबांनी समृद्धी दूध संघ व ऊस ऊत्पादक शेतक-यांना न्याय मिळावा म्हणून कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठबळावर अन्नपूर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स लि.केनवडे कारखान्याची उभारणी केली.
उत्तम वाडकर, इंजिनिअर, व्हन्नाळी
04386

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com