Wed, Sept 27, 2023

म्हाकवेत पारंपारिक पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी
म्हाकवेत पारंपारिक पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी
Published on : 23 April 2023, 2:54 am
04390
म्हाकवेत शिवजयंती उत्साहात
म्हाकवे : छत्रपती शिवाजी महाराज की जय...च्या जयघोषात हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत येथे संयुक्त शिवजयंती झाली. पन्हाळगडावरून शिवज्योत आणण्यात आली. शेतकरी बंधूंनी बैलजोड्या सजवून शिवज्योतीच्या सोहळ्यात सहभागी केल्या होत्या. शिवजयंतीची मिरवणूक निघाली. विविध देवालयांना शिवज्योतीतर्फे भेटी देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारंपारिक वेशभूषा प्रदान केलेल्या लहान मुलांना बक्षीस वाटप केले. मिरवणुकीत बैलगाड्या खास आकर्षण होते. कागल पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.