
संजयबाबा घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
B04397
संजय घाटगे यांच्या
वाढदिनी विविध उपक्रम
म्हाकवे, ता. २७ : माजी आमदार, अन्नपूर्णा शुगरचे संस्थापक चेअरमन संजय घाटगे यांचा ७० वा वाढदिवस विविध उपक्रमांनी झाला. रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, धान्य, शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम झाले.
बामणी (ता. कागल) येथे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप झाले. अध्यक्षस्थानी माजी सरपंच रावसाहेब पाटील होते. स्वागत व प्रास्ताविक युवराज कोईगडे यांनी केले. यावेळी युवराज पाटील, बाबूराव मगदूम, तानाजी मगदूम, शिवाजी मगदूम, प्रवीण बुवा, भिकाजी मगदूम, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास तातोबा मगदूम, नारायण पाटील, सागर मगदूम, मारुती पाटील अण्णाप्पा पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. आभार मधुकर मगदूम यांनी मानले.
भुदरगड तालुक्यातील धनगरवाडा गिरगाव, धनगरवाडा बसुदेव व परिसरात १५० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप झाले. व्हनाळी (ता. कागल) येथील तानाजी कांबळे यांच्यातर्फे साहित्य वाटप झाले. यावेळी भगवानराव गुरव, प्रकाश पाटील, जे. के. गोरंबेकर, रसूल शेख, सिद्धांत कांबळे, अनिरुद्ध कांबळे उपस्थित होते.