
परमात्मराज महाराज: आडी येथील श्री दत्त देवस्थान मठात वैशाख पौर्णिमा उत्साहात
04426,04428
आडी: येथील प्रवचनात बोलताना परमात्मराज महाराज. समोर उपस्थित भाविक
...
अध्यात्म आवडल्यास आत्मस्वरूपाचे ज्ञान सोपे
परमात्मराज महाराज: आडी येथील श्री दत्त देवस्थान मठात वैशाख पौर्णिमा उत्साहात
म्हाकवे, ता.६: ‘आवड असल्यास जगातील कोणतेही अवघड विषय अभ्यासाने समजून घेता येऊ शकतात. त्याप्रमाणे अध्यात्माविषयी आवड असल्यास आत्मस्वरूपाचे ज्ञान समजणे सोपे होते. आत्मस्वरूप सर्वव्यापक आहे,’ असे प्रतिपादन परमात्मराज महाराज यांनी केले.
आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरी वरील श्रीदत्त देवस्थान मठाच्या वतीने वैशाख पौर्णिमेनिमित्त सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते. सकाळी दत्त मंदिरात श्री दत्तगुरुचरणी अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली.
परमात्मराज महाराज म्हणाले,‘ आत्मस्वरूपासंबंधीचा विचार म्हणजे अध्यात्म होय. मनुष्याची सावली तसेच देह सुद्धा अस्थिर आहे. देहाचे अधिष्ठान आत्मस्वरूप आहे. वेदांतात आत्मा सर्वव्यापक आहे. अज्ञानापासून सुटका करून घेण्यासाठी अध्यात्मज्ञान प्राप्त करण्याची आवश्यकता आहे. ज्ञानाने होणारा आनंद हा अनंत काळासाठी लाभणारा असतो. व्यक्तीचे कर्म त्याला पुढील गती देत असते.’
यावेळी निपाणी येथील अविनाश आंबले यांनी महाप्रसादाची सोय केली होती. उमा वाशीकर (हुपरी), सौरभ कोरव (यमगर्णी), काकासो हेगाजे (सुळकुड), अक्षय मोरे (उजळाईवाडी), चंद्रकांत पाटील (बुदीहाळ), दिलीप पाटील (खेबवडे), खुशी खोत (कोडणी), दत्तात्रय पाटील (म्हाकवे) यांचा परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कार झाला.