Sun, October 1, 2023

आडी येथे आजपासून परमात्मराज महाराज यांचा जन्मोत्सव
आडी येथे आजपासून परमात्मराज महाराज यांचा जन्मोत्सव
Published on : 17 May 2023, 5:42 am
आडी येथे आजपासून परमात्मराज महाराज यांचा जन्मोत्सव
म्हाकवे : आडी (ता. निपाणी) येथील संजीवन गिरीवरील श्री दत्त देवस्थान मठातर्फे परमाब्धिकार परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या जन्मोत्सव दिनानिमित्त गुरुवार (ता. १८) ते (ता. २०) शनिवरपर्यंत परमार्थिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. २०) सकाळी श्री दत्तगुरु चरणी अभिषेक, महाआरती परमात्माराज महाराजांच्या हस्ते होईल. त्यानंतर भाविकांकडून परमात्मराज महाराजांची पाद्यपूजा व आरती होणार आहे. रात्री साडेसात वाजता सर्वेज्यसांस्कृतिक भवनात परमपूज्य परमात्मराज महाराज यांना जन्मोत्सव दिनानिमित्त शुभेच्छा समारंभ होणार आहे. या वेळी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.