आडी येथे परमाब्धि ग्रंथ पारायणाचा शुभारंभ : शेकडो भाविकांची उपस्थिती: परमात्मराज महाराज यांच्या जन्म दिनानिमित्त आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आडी येथे परमाब्धि ग्रंथ पारायणाचा शुभारंभ : शेकडो भाविकांची उपस्थिती: परमात्मराज महाराज यांच्या जन्म दिनानिमित्त आयोजन
आडी येथे परमाब्धि ग्रंथ पारायणाचा शुभारंभ : शेकडो भाविकांची उपस्थिती: परमात्मराज महाराज यांच्या जन्म दिनानिमित्त आयोजन

आडी येथे परमाब्धि ग्रंथ पारायणाचा शुभारंभ : शेकडो भाविकांची उपस्थिती: परमात्मराज महाराज यांच्या जन्म दिनानिमित्त आयोजन

sakal_logo
By

04463

आडी: येथील परमाब्धि ग्रंथ पारायणास बसलेले भाविक.

...

आडी येथे परमाब्धि ग्रंथ पारायणाला प्रारंभ

म्हाकवे: आडी (ता. निपाणी ) येथील श्रीदत्त देवस्थान मठाच्या वतीने परमाब्धिकार परमात्मराज महाराज यांच्या जन्म दिनोत्सवानिमित्त श्री गुरुदत्तात्रेयांच्या प्रतिमेचे आणि वैश्विक ग्रंथराज ''परमाब्धि'' ग्रंथाचे पूजन, भजन, नामजपाने परमाब्धि ग्रंथ पारायणाचा प्रारंभ झाला. यावेळी सकाळी सात वाजता श्री दत्त मंदिरात दत्तगुरूंच्या चरणी अभिषेक अर्पण व महाआरती करण्यात आली. उपस्थित शेकडो भाविकांनी सर्वेज्य सांस्कृतिक भवनामध्ये परमाब्धि ग्रंथ पारायणामध्ये सहभाग घेतला. आश्रमस्थ नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अमोल महाराज, समाधान महाराज, मारुती महाराज यांच्या सान्निध्यात पारायणाचा प्रारंभ झाला. यावेळी आडी, बेनाडी, हंचिनाळ, हणबरवाडी, कोगनोळी, सौंदलगासहित निपाणी, कागल, गडहिंग्लज, कोल्हापूर, बेळगांव, पुणे या भागातील स्त्री-पुरुष भाविकांनी पारायणामध्ये सहभाग घेतला.पारायणाच्या पहिल्या दिवशीच्या सत्रात परमाब्धि ग्रंथाच्या बारा अध्यायांचे वाचन करण्यात आले. शनिवार (ता.२०) पर्यंत परमाब्धि ग्रंथ पारायण, भजन, नामजप आदी पारमार्थिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.