परमात्मराज महाराज यांच्या जन्मदिनोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परमात्मराज महाराज यांच्या जन्मदिनोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
परमात्मराज महाराज यांच्या जन्मदिनोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

परमात्मराज महाराज यांच्या जन्मदिनोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

sakal_logo
By

04469

आडी : परमात्मराज महाराज यांच्या जन्मदिनोत्सवानिमित्त त्यांना दीपाआरतीने औक्षण करण्यात आले.
...


परमात्मराज महाराज यांच्या
जन्मदिनोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

म्हाकवे: आडी (ता. निपाणी) येथील संजीवन गिरीवरील दत्त देवस्थान मठात परमाब्धिकार परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या जन्मदिनोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. परमात्मराज महाराजांचे दर्शन व त्यांना सदिच्छा देण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. श्री दत्त मंदिरात अभिषेकानंतर भाविकांच्या उपस्थितीत महाआरती झाली. परमाब्धिकार परमात्मराज महाराज यांची भाविकांच्यावतीने आश्रमस्थ साधकांकडून पाद्यपूजा करण्यात आली. श्याम भटजी मांगुर यांनी विधिवत मंत्रोच्चार केला. यावेळी देविदास महाराज, आश्रमस्थ नामदेव महाराज, राम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, समाधान महाराज, चिदानंद महाराज, श्रीधर महाराज, अमोल महाराज, मारुती महाराज, वैज्ञानिक के. ए. लोहार (इस्रो) बेंगलोर, संदीप बादरायणी पुणे, उद्योजक सतीश भोजे, सागर ढेंगे, रामचंद्र मुदाळे यांच्यासह निपाणी, कोल्हापूर, बेळगांव, पुणे भागातील भाविक उपस्थित होते.दुपारी भजन नामजप व परमाब्धि पारायणाचा समारोप महाआरतीने झाला.