
आनुर येथील अपघातात दोन गंभीर जखमी टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक
04472
आनुरः येथे टेम्पो व दुचाकी यांचा अपघात झाला.
...
आनुर येथे टेम्पोची दुचाकीला धडक
दोघे गंभीर जखमी ः
सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे,ता.२०: आनुर (ता.कागल) येथे आनुर-बानगे चौकात टेम्पो व दुचाकी यांच्यामध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये
मडिलगे (ता.भुदरगड) येथील काकासाहेब किल्लेदार व अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. एकाचे नाव समजू शकले नाही. रात्री उशीरापर्यंत अपघाताची नोंद कागल पोलिसांत झालेली नव्हती.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सावर्डे (ता.कागल) येथील टेम्पो (एम एच ०९-एफ.एल.८३२८) बस्तवडेकडून गोरंबेकडे येत होता. याचवेळी म्हाकवेहून बानगेकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला टेम्पोची जोरदार धडक बसल्याने दोघे बाजूला फेकले गेले. दुचाकी टेम्पोच्या खाली गेल्याने किल्लेदार यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. दुसऱ्या जखमीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. जखमींना कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले आहे.
आनुर येथील हा चौक मृत्यूचा सापळा बनला असून आतापर्यंत या ठिकाणी अनेक लहान मोठे अपघात झाले आहेत. कागल- मुरगूड या मार्गावरून वाहतूक करणारी वाहने अत्यंत वेगाने जात असतात. याचवेळी आनुर गावातून बानगेकडे जाताना येथे अनेकवेळा अपघात झाले आहेत. या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.