परमनंट काम करायचे नाही मात्र मुश्रीफ स्वतःला परमनंट आमदार म्हणतात  :  समरजीतसिंह घाटगे यांचा घणाघात  : आरोग्य केंद्रामध्ये सुसज्ज स्वच्छतागृहांचा अभाव, हाच का माता-भगिनींचा सन्मान

परमनंट काम करायचे नाही मात्र मुश्रीफ स्वतःला परमनंट आमदार म्हणतात : समरजीतसिंह घाटगे यांचा घणाघात : आरोग्य केंद्रामध्ये सुसज्ज स्वच्छतागृहांचा अभाव, हाच का माता-भगिनींचा सन्मान

04490
म्हाकवेः येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटपप्रसंगी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे. शेजारी अन्य मान्यवर.
...

मुश्रीफांनी कागलचा सर्वसमावेशक
पर्मनंट विकास केला नाही

समरजीतसिंह घाटगे : म्हाकवे येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटप

म्हाकवे, ता.२९: ‘विकासकामांच्या आकडेवारीच्या मोठ्या गप्पा मारणाऱ्यांच्या कागल विधानसभा मतदारसंघातील बहुतांश आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमध्ये सुसज्ज स्वच्छतागृहांचा अभाव आहे. ग्रामविकासमधून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला म्हणता, मग शाळांना गळती का? कोणतेही काम पर्मनंट करायचे नाही, मात्र स्वतःला पर्मनंट आमदार म्हणायचे. मुश्रीफांनी जाणीवपूर्वक कागलचा सर्वसमावेशक पर्मनंट विकास केला नाही’, असा घणाघात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केला.
म्हाकवे (ता.कागल) येथे बांधकाम कामगार यांना साहित्य वाटप तसेच आयुष्यमान भारत कार्ड वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते पी. डी. चौगुले होते.
घाटगे म्हणाले ‘कागल तालुका आरोग्य व शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा तालुक्यात उपलब्ध झाल्या पाहिजेत. गेल्या वीस वर्षात एकही मोठे सरकारी हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था तालुक्यात उभारू शकले नाहीत, हे दुर्दैव आहे. तालुक्याचा विकास कसा असतो हे पाच वर्षात आपण दाखवून देवू. त्याकरिता जनतेने मला एकवेळ आमदारकीची संधी द्यावी.’
यावेळी नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल रणजीत लोहार यांचा सत्कार घाटगे यांच्या हस्ते झाला.
स्वागत महावीर पाटील यांनी केले. कार्यक्रमास धनंजय पाटील, ए. डी. पाटील, प्रताप पाटील, संदीप कांबळे, हिंदुराव मालवेकर, दीपा पाटील आदी उपस्थित होते. आभार रावसाहेब पाटील यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com