साकेत शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा : गुणवंत विद्यार्थी सत्कार : पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर पुरस्कारांचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साकेत शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा  : गुणवंत विद्यार्थी सत्कार : पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर पुरस्कारांचे वितरण

sakal_logo
By

04516
साकेत शिवराज्याभिषेकदिनी विविध कार्यक्रम
म्हाकवे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा साके (ता. कागल) येथे उत्साहात झाला. ग्रामपंचायतीत शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सुशीला पोवार, उपसरपंच प्रभावती जाधव, बाळासाहेब तुरंबे यांच्या हस्ते झाले. सुभद्रामाता हायस्कूलचा दहावी परीक्षेतील गुणवंत अथर्व पाटील, अमृता निऊंगरे, प्रणाली चौगले, ओंकार लोहार, ऋतुजा जाधव यांचा सत्कार झाला. अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशासेविकांना प्रमाणपत्रांचे वाटप झाले. आक्काताई पाटील, आक्काताई चौगले, आरोग्यसेविका रूपाली पाटील, दीपाली मुसळे यांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने गौरविले. स्वागत व प्रास्ताविक मारुती पाटील यांनी केले. यावेळी तालुका संघाचे संचालक बाळासाहेब तुरंबे, युवराज पाटील, रवींद्र जाधव, नीलेश निऊंगरे, सुजय घराळ, मोहन गिरी, सी. बी. कांबळे, बापूसो पाटील, तेजस्विनी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सुरेश आगळे, भरत जाधव, शिवाजी निऊंगरे, संदीप लोहार, बाबूराव पाटील, तुकाराम पाटील उपस्थित होते. ग्रामसेवक संजय पाटील यांनी आभार मानले.