
कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रस्त्यावरील झुडपे काढण्याची मागणी
02414
कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या
रस्त्यावरील झुडपे काढण्याची मागणी
माजगाव ः कोतोली (ता. पन्हाळा) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रस्त्यावरील झुडपे काढण्याची मागणी रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. अभिजित जाधव यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे केली आहे.
या आरोग्य केंद्रामध्ये दररोज शंभर ते दीडशे रुग्णांची तपासणी केली जाते. येथे पोर्लेपासून नांदगावपर्यंतचे रुग्ण तपासणीसाठी येतात. कोतोली मुख्य रस्त्यापासून आरोग्य केंद्रापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असणारी झुडपे ही रस्त्यावर आलेली आहेत. रस्त्यावर मोठे खड्डे आहेत. रस्ता अरुंद असल्यामुळे दोन वाहने एकाच वेळी ओव्हरटेक करू शकत नाहीत. रस्त्याकडेची जागा भुसभुशीत असल्यामुळे रुग्ण घेऊन येणारी वाहने अडकून बसण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्यावर अनेक वेळा वाहने उभी केली असल्याने इमर्जन्सी रुग्ण घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रस्त्यावरील झुडपे काढण्याची, खड्डे बुजविण्याची आणि रुंदीकरण करण्याची मागणी डॉ. जाधव यांनी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mjg22b01972 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..