टुडे २ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे २ स
टुडे २ स

टुडे २ स

sakal_logo
By

03237
पुशिरे ः ओढ्यावरील निसटलेली पाईप व तुटलेला रस्ता.
पुशिरे ओढ्यावरील रस्ता धोकादायक
पुनाळ : पुशिरे-म्हाळुंगे (ता. पन्हाळा) येथील ओढ्यावरील रस्ता तुटल्याने धोकादायक बनला आहे. ग्रामपंचायतीने सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवाशांना कळावे म्हणून तात्पुरती रिबन बांधली आहे. पुशिरे व म्हाळुंगे दरम्यानच्या धोकादायक वळणावर स्मशानशेड आहे. स्मशानशेड व मुख्य रस्ता यांच्यात ओढा आहे. पावसाचे डोंगराकडून येणारे पाणी व शेतवडीतील पाणी याच ओढ्याला येते. परिसरात जोराचा पाऊस सुरू आहे. ओढ्याला पाणी जास्त आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे ओढ्यावरील पाईप निखळले आहेत. त्यामुळे रस्ता तुटला आहे. या रस्त्यावरील वाहतूक नेहमी वर्दळीची आहे. रात्री-अपरात्री या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

सातार्डेत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
माजगाव ः शिवगर्जना फौंडेशन सातार्डे (ता. पन्हाळा) या शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्ताने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. दोन गटात स्पर्धा होणार आहेत लहान गट: ‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’,‘मोबाईल शाप की वरदान’ व ‘आई-वडील माझे थोर’ हे विषय आहेत. मोठ्या गटात: ‘वृद्धाश्रम : समस्या की समाधान’, ‘आपले सण : उद्देश आणि वास्तविकता’, ‘कृषिप्रधान भारतातील शेती’ : ‘समस्या अन्‌ संधी व मी महिला’ : खरंच सुरक्षित आहे? अनुक्रमे तीन क्रमांकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार असून, प्रवेश फी १० रुपये आहे. जास्तीजास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, ही स्पर्धा रामचंद्र पवार हायस्कूल परखंदळे (ता. पन्हाळा) येथे होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mjg22b02045 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..