गजानन सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गजानन सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा
गजानन सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

गजानन सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

sakal_logo
By

02560
माजगाव ः येथील गजानन सेवा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी संचालक मंडळ.

गजानन सेवा संस्थेची वार्षिक सभा
माजगाव ः येथील श्री गजानन विकास सेवा संस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डी. जी. पाटील होते. अहवालवाचन सचिव तानाजी निकम यांनी केले. ताळेबंद वाचन करून त्यास अनुमती देण्यात आली. आर्थिक वर्षात संस्थेस २ लाखांचा नफा झाला. सभासदांना ५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय झाला. निवडणूक खर्च अंदाजे ७० हजार आला. तो पुढील दोन वर्षांत संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. १०० टक्के वसुली झाल्याबद्दल अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते सचिव तानाजी निकम यांचा सत्कार झाला. यावेळी संस्थेच्या कामकाजाबाबत चर्चा झाली. यावेळी उपाध्यक्ष अशोक कांबळे, रवी पाटील, तानाजी पाटील, युवराज चौगले, सविता चौगले, नंदू जाधव, बंटू जाधव, सागर जाधव, संग्राम जाधव, प्रताप चौगले, पांडुरंग मगदूम, तुकाराम मगदूम, संजय जाधव, शुभम चौगले, रामचंद्र कांबळे, लाजरस कांबळे उपस्थित होते. प्रा. अमर पाटील यांनी स्वागत केले. विशाल पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mjg22b02047 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..