पडळ येथे सोमवारी राजू शेट्टी यांची सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पडळ येथे सोमवारी राजू शेट्टी यांची सभा
पडळ येथे सोमवारी राजू शेट्टी यांची सभा

पडळ येथे सोमवारी राजू शेट्टी यांची सभा

sakal_logo
By

पडळ येथे सोमवारी राजू शेट्टी यांची सभा

माजगाव ता.८ : पडळ (ता.पन्हाळा) येथील एसटी स्टॅण्ड चौकात सोमवारी (ता.१० ) सायंकाळी ६ वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांची सभा होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दालमिया कारखाना परिसर अध्यक्ष दगडू गुरवळ यांनी दिली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष जालिंदर पाटील हे देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सभेत केंद्र सरकारने व राज्य सरकारने उसाच्या एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे. तो उधळून लावण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरणार आहे. या सभेला शेतकऱ्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे पन्हाळा तालुका अध्यक्ष रामराव चेचर यांनी केले आहे.