अनुराधा दूध संस्थेतर्फे लांभाश वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुराधा दूध संस्थेतर्फे लांभाश वाटप
अनुराधा दूध संस्थेतर्फे लांभाश वाटप

अनुराधा दूध संस्थेतर्फे लांभाश वाटप

sakal_logo
By

अनुराधा दूध संस्थेतर्फे लाभांश वाटप
माजगाव ः माजगाव पैकी माळवाडी (ता. पन्हाळा) येथील सौ. अनुराधा सहकारी दूध संस्थेतर्फे दूध उत्पादकांना दीपावलीनिमित्त लाभांश, फराळ साहित्य आणि भेटवस्तूंचे वाटप झाले. म्हैस दुधास १४ टक्केप्रमाणे २ लाख ९७ हजार तर गाय दुधास १२ टक्केप्रमाणे १ लाख ४० हजार रक्कम लाभांश म्हणून वाटप केली. संस्थेतर्फे प्रत्येकी ६४२ रु.प्रमाणे ३९ हजारांचे फराळ साहित्य व भेटवस्तूंचे वाटप केले. पोपट वडाम यांनी म्हैस दूध गटात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार झाला. यावेळी अध्यक्ष अमर वडाम, उपाध्यक्ष महादेव पाटील,संचालक संजय विचारे, कृष्णात वडाम, पोपट वडाम, सर्जेराव विचारे, कृष्णात पाटील, सचिन पाटील, हरिबा वडाम, शहाजी पाटील, उदय वडाम, रवींद्र विचारे, सरदार वडाम, रामचंद्र भोमकर उपस्थित होते. सचिव विलास वडाम यांनी आभार मानले.