महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराजचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराजचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराजचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराजचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

sakal_logo
By

पै. पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी
माजगाव : महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस देवठाणे (ता. पन्हाळा) येथे मूळ गावी विविध उपक्रमांनी झाला. वाढदिवसानिमित्ताने विविध आरोग्य व रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम झाले. विविध स्पर्धाही झाल्या. ओल्ड सायलेन्सर फायरिंग स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, श्वान व संगीत खुर्ची स्पर्धा झाल्या. विजेत्यांना रक्कम, प्रशस्तीपत्र, मानचिन्ह देत गौरविले. पृथ्वीराजला विविध मित्र परिवार व नातेवाईकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मारुती पाटील, बाबासाहेब पाटील, उपमहाराष्ट्र केसरी पै. संग्राम पाटील, महाराष्ट्र चॅम्पियन पै. धनाजी पाटील, पै. राजवर्धन पाटील, पै. इंद्रनील पाटील, पै. गुरुराज पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.