माळवाडी रस्त्यावर धोकादायक कमी उंचीवर वीज तारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळवाडी रस्त्यावर धोकादायक कमी उंचीवर वीज तारा
माळवाडी रस्त्यावर धोकादायक कमी उंचीवर वीज तारा

माळवाडी रस्त्यावर धोकादायक कमी उंचीवर वीज तारा

sakal_logo
By

02706
माजगाव ः शिंदेवाडीदरम्यान रस्त्यावर कमी उंचीवर असणाऱ्या वीजतारा.
----------

माळवाडी रस्त्यावर धोकादायक वीजतारा
माजगाव ः पन्हाळा तालुक्यातील माजगाव फाटा ते शिंदेवाडीदरम्यानच्या रस्त्यावर माळवाडीत वीजतारा कमी उंचीवर धोकादायक स्थितीत आहेत. या तारा अवजड वाहनांसाठी धोकादायक ठरू शकतात. महावितरणने वीज तारांची उंची वाढवावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. महादेव पाटील महाराज यांच्या घराजवळ कमी उंचीवर वीजतारा आहेत. या रस्त्यावरुन वाहनांची वर्दळ असते. तीन साखर कारखान्यांची ऊसवाहतूकही सुरु आहे. ट्रॅक्टरला त्या तारांचा स्पर्श होतो. त्या पार्श्‍वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने धोकादायक वीज तारांची उंची वाढवावी, अशी मागणी शिंदेवाडीच्या सरपंच श्रीमती सिंधुताई शिंदे यांनी केली आहे.