नणुंद्रेत जलजीवन योजनेचे भूमीपुजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नणुंद्रेत जलजीवन योजनेचे भूमीपुजन
नणुंद्रेत जलजीवन योजनेचे भूमीपुजन

नणुंद्रेत जलजीवन योजनेचे भूमीपुजन

sakal_logo
By

02717
नणुंद्रे ः येथे नळपाणी योजनेचे भूमिपूजन सरपंच अश्विनी पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

नणुंद्रेत जलजीवन योजनेचे भूमिपूजन
माजगाव : नणुंद्रे (ता. पन्हाळा) येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा, या हेतूने जलजीवन मिशन योजनेतून नळपाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी ५५ लाखांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरूवात होणार आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर मुबलक पाण्याची उपब्धता होईल. या कामाचे भूमिपूजन सरपंच अश्विनी पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच प्रकाश सुतार, ग्रा. पं. सदस्या वंदना पाटील, छाया जाधव, रेखा बाऊचकर तसेच आनंदा पाटील, शशिकांत पाटील, ग्रामसेविका जयश्री पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.