हमालाचा पोरगा झाला उत्पादन शुल्क अधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हमालाचा पोरगा झाला उत्पादन शुल्क अधिकारी
हमालाचा पोरगा झाला उत्पादन शुल्क अधिकारी

हमालाचा पोरगा झाला उत्पादन शुल्क अधिकारी

sakal_logo
By

02747
बबन पाटील

हमालाचा पोरगा झाला
उत्पादन शुल्क अधिकारी

कोतोलीच्या बबन पाटीलचे यश

सागर चौगले / सकाळ वृत्तसेवा
माजगाव ता. २० ः घरची परिस्थिती जेमतेम, आई-वडील अशिक्षित. वडील शाहू मार्केट यार्डात हमालीचे काम करतात. अशा परिस्थितीचा कांगावा न करता जिद्द, चिकाटी व नियोजबद्ध अभ्यासाच्या जोरावर राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षकपदी उत्तीर्ण होऊन पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील बबन महिपती पाटील याने युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
घरच्या परिस्थितीशी वेळोवेळी जुळवून घेत बबनने इंजिनिअरींगपर्यंत शिक्षण पूर्ण केले. काही काळ पुणे येथील खासगी कंपनीत नोकरी केली. मात्र अधिकारी होण्याची तळमळ गप्प बसू देईना. म्हणून बबनने नोकरी सोडून थेट गावचा रस्ता धरला. गावी आल्यानंतर खासगी क्लास न लावता मित्रांच्या मार्गदर्शनाच्या बळावर अभ्यासाला सुरूवात केली. प्रथम आर.टी.ओ.अधिकारी, त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक नंतर तलाठी अशा वेगवेगळ्या परीक्षा दिल्या. परीक्षेत एक-दोन गुणांनी अपयश आले व यशाने हुलकावणी दिली. तरीही अपयशाने जराही खचून न जाता महाराष्र्ट लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्य उत्पादन शुल्क परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन पन्हाळा तालुक्यात ठसा उमटविला. बबनच्या यशामुळे होणारे सत्कार पाहून आई-वडील भारावून गेले आहेत.