Fri, March 31, 2023

पडळ येथे कासारी नदीत मगरीचा वावर
पडळ येथे कासारी नदीत मगरीचा वावर
Published on : 3 December 2022, 7:02 am
पडळ येथे कासारी नदीत मगरीचा वावर
माजगाव : पडळ (ता. पन्हाळा) येथील ‘पोवार मळी’ परिसरात कासारी नदीपात्रात शेतकऱ्यांना मगरीचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच यवलूज परिसरातील कासारी नदीपात्रात नागरिकांना मगरीचे दर्शन झाले होते. शनिवारी दुपारी पडळ येथील पोवार मळी परिसरात कासारी नदीपात्रात मगरीचे दर्शन झाल्यामुळे वनविभागाने या मगरीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.