Tue, Jan 31, 2023

शिंदेवाडीत लंम्पीस्कीन आजाराने बैलाचा मृत्यू
शिंदेवाडीत लंम्पीस्कीन आजाराने बैलाचा मृत्यू
Published on : 5 December 2022, 4:16 am
शिंदेवाडीत लम्पी स्कीनने बैलाचा मृत्यू
माजगाव ः पन्हाळा तालुक्यातील माजगावपैकी शिंदेवाडी येथील शहाजी जगताप यांच्या बैलाचा लम्पी आजारामुळे उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पडळ पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत आतापर्यंत गावातील गायवर्गीय ११ जनावरांचा लम्पी आजारामुळे मृत्यू झाला. लम्पीबाधित १२८ पैकी ८८ जनावरे उपचारांमुळे बरी झाली आहेत. पशुपालकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेचे पालन करावे, रोगाबाबत लक्षणे आढळल्यास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन पडळ पशुधन विकास अधिकारी डॉ. सूरज कांबळे व पशुधन पर्यवेक्षक दत्तात्रय कुंभार यांनी केले आहे.