Sat, June 10, 2023

पडळच्या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा
पडळच्या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा
Published on : 9 February 2023, 12:08 pm
पडळच्या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा
माजगाव : पडळ (ता. पन्हाळा) येथील ग्रामसभा सरपंच सविता केकलेकर यांच्या अध्यतेखाली झाली. या सभेत विविध विषयावर चर्चा झाली. पाणीपट्टी, स्वच्छता, बालग्राम समिती, विविध समिती, सांडपाणी व्यवस्था, अंगणवाडी घरकुल यादी आदी विषयांवर चर्चा झाली. चर्चेत माजी सरपंच जयश्री राऊत, संजय कदम, बाळू कदम, सुधाकर पाटील, प्रा. नंदकुमार बुराण आदींनी प्रश्न विचारले. ग्रामसेवक अंकुश शेलार यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या वेळी उपसरपंच दिलीप अतिग्रे, नवनाथ पाटील, स्वप्नील केकलेकर, अरविंद पाटील, अवधूत मोहिते, योगीता पवार, रुपाली पाटील, प्रियांका शिंदे, वैशाली बोरगे, अश्विनी राऊत, गीता बुचडे, पोपट निकम, अभिनंदन पोवार, संग्राम पवार उपस्थित होते. ग्रामसेवक अंकुश शेलार यांनी सूत्रसंचालन केले.