पडळ फाटा ते  माजगाव रस्ता  धोकादायक

पडळ फाटा ते माजगाव रस्ता धोकादायक

02971

पडळ फाटा-माजगाव
रस्ता धोकादायक

दिशादर्शक व रिफ्लेटर, बॅरिकेड्सचा अभाव

माजगाव, ता. १९ : पडळ फाटा ते माजगाव (ता. पन्हाळा) दरम्यान साळ्याच्या ओढ्याजवळ रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. बाजूपट्ट्याची खुदाई केली आहे. मात्र ठेकेदाराने खोदाईचा मार्ग दर्शविण्यासाठी व सुरक्षेच्या दृष्टीने रिफ्लेक्टर अगर बॅरिकेडस् लावण्याची आवश्यकता होती. पण ठेकेदाराने खडीची पोती ठेवून जबाबदारी झटकली आहे. यामुळे मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.
पडळ फाट्याजवळ साळ्याच्या ओढ्यावर रुंदीकरण सुरु आहे. रस्त्याची बाजूपट्टी अडीच फूट उंचीने खोदली आहे. रस्त्याशेजारून पर्यायी मार्ग सुरू ठेवला आहे. खुदाई केलेला मार्ग दर्शविण्यासाठी रिफ्लेक्टर अगर बॅरिकेट लावण्याची नितांत गरज असताना ठेकेदाराने कापडी पट्ट्या बांधून खडीची पोती भरून ठेवली आहेत. यामुळे रात्री वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. परिणामी वाहनधारक थेट खोदाई केलेल्या बाजूपट्ट्यामध्ये पडून जायबंदी होण्याची शक्यता आहे. सध्या ऊसवाहतूक वाहनांची वर्दळ आहे. एखाद्या वाहनधारकाचा जीव गेल्यावर संबंधित ठेकेदाराला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
--------------
कोट
पडळ फाटा-माजगाव वर्दळीचा मार्ग आहे. येथे अपघात होऊन जीवितहानी होण्यापूर्वी संबंधित ठेकेदारांनी तातडीने उपाययोजना करावी.
ः- नवनाथ कुंभार, सचिव, पन्हाळा तालुका ग्राहक पंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com