बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावे
बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावे

बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावे

sakal_logo
By

02991
बचत गटांच्या माध्यमातून
महिलांनी स्वावलंबी व्हावे

आमदार कोरे; नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्सना एक लाख बक्षीस

माजगाव ता. २४ : महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट तयार करून वेगळेपण स्पष्ट करावे. बचत गटांच्या माध्यमातून महिला स्वावलंबी व्हावे. यामुळे बचतगटांची उन्नती होण्यास मदत होणार आहे. नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट बनविणाऱ्या बचत गटास जनसुराज्य पक्षाच्यावतीने एक लाख रुपये बक्षीस तसेच बचत गटांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत मार्गदर्शन करणार असल्याची ग्वाही आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. कोतोली (ता. पन्हाळा) येथे बचत गट मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी कोतोलीतील श्री हनुमान नागरी पतसंस्थेने २० लाख, राजीवजी पतसंस्थेने ४० लाख, संजयसिंह नागरी पतसंस्थेने २० लाख, संजीवनी पतसंस्थेने ४० लाख याप्रमाणे जिल्हा बँकेत ठेव जमा केली. आमदार कोरे यांच्या हस्ते ठेवीचे प्रमाणपत्र संस्थेला देण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका श्रुतिका शाहू काटकर, बँकेचे सीईओ डॉ. ए. बी. माने, स्मिता गवळी, शंकर पाटील, पन्हाळा माजी उपसभापती रश्मी कांबळे, प्रशांत पाटील, धनाजी गुरव, पन्हाळा तालुका विभागीय अधिकारी भरत घाटगे तसेच तालुक्यातील २०१ महिला बचत गटाच्या अध्यक्षा, सचिव, सदस्या उपस्थित होत्या.