सकाळ इम्पॅक्ट   उत्रेत गव्याकडून झालेल्या नुकसानीची पाहणी

सकाळ इम्पॅक्ट उत्रेत गव्याकडून झालेल्या नुकसानीची पाहणी

सकाळ इम्पॅक्ट
02993
उत्रेत गव्याकडून झालेल्या
नुकसानीची पाहणी

माजगाव ता. २५ ः उत्रे (ता. पन्हाळा) येथील निकमवाडी व उदाळवाडी डोंगर परिसरातील ‘वांजुळे दरा’ नावाच्या शेतात गव्यांच्या कळपानं पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वन खात्याने गव्यांचा बंदोबस्त करावा व नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. यासंदर्भात ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध करताच वनरक्षक प्रतिभा पाटील व कृषी सहायक माधुरी पाटील यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनामे केले. शासनस्तरावरून भरपाई व गव्यांना हुसकावून लावण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
परिसरात मुबलक चारा व निवारा मिळाल्याने गव्यांचा वावर वाढला आहे. गवे ऊस, मका व इतर पिके फस्त करून नासधूस करतात. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. गव्यांच्या भीतीने शेतकरी शेतात जाण्यास टाळाटाळ करतात. यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. उन्हाळ्यामुळे ऊस पिकासह इतर पिकांना जादा पाण्याची गरज भासत आहे. शेतकरी गव्यांच्या भीतीमुळे रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेताकडे जात नाहीत. शेतकरी जीव मुठीत घेऊन शेताकडे जात आहेत. दुर्घटना होण्यापूर्वी वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा व पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com