Wed, June 7, 2023

माजगावच्या अरुण सेवा संस्थेची निवडणूक पाचव्यांदा बिनविरोध
माजगावच्या अरुण सेवा संस्थेची निवडणूक पाचव्यांदा बिनविरोध
Published on : 12 March 2023, 2:42 am
माजगावच्या अरुण सेवा संस्थेची
निवडणूक पाचव्यांदा बिनविरोध
माजगावः पन्हाळा तालुक्यातील माजगाव येथील श्री. अरुण विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक कुंभी कारखान्याचे माजी संचालक आनंदराव माने यांच्या नेतृत्वाखाली पाचव्यांदा बिनविरोध झाली. सलग पंचवीस वर्षे संस्थेची बिनविरोध निवडणूक परंपरा कायम राहीली आहे.
नूतन संचालक मंडळ असे:- अनिल रामराव चौगले, रंगराव पांडुरंग चौगले, राजाराम बाबूराव दिंडे, धनंजय आत्माराम पाटील, विलास बाबूराव मगदूम, हिंदुराव शिवाजी माने, आनंदा दौलू वडाम, संगीता सुरेश पाटील, विजया बळवंत चौगले, गणपती नाथा कुंभार. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बी. आर. वडाम, मोहन दिंडे, माजी सरपंच जे. के. पाटील, बी. टी.चौगले यांचे सहकार्य मिळाले. आभार सचिव चंदर खोत यांनी मानले