माळवाडी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळवाडी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
माळवाडी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

माळवाडी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

sakal_logo
By

03042
माळवाडी प्राथमिक शाळेत
शैक्षणिक साहित्य वाटप

माजगाव ः कोतोली पैकी माळवाडी (ता. पन्हाळा) येथील प्राथमिक शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना फ्रेंडशिप ग्रुप संचालित अंकुर फौंडेशन, कोतोली यांच्या मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप झाले. स्कूल बॅग, वह्या, पेन इत्यादी शैक्षणिक साहित्याचा समावेश होता. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सागर पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक प्रभाकर पाटील होते. यावेळी अंकुर फौंडेशनचे अध्यक्ष संग्राम पाटील यांनी फौंडेशनच्या कार्याची माहिती दिली. माजी उपसरपंच संतोष खोत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला अंकुर फौंडेशनचे सदस्य महादेव चौगले, दत्तात्रय चौगले, जगनाथ गायकवाड, सागर गायकवाड, बाळासो गायकवाड, संजय मुगडे, विक्रम पाटील, संतोष संकपाळ, जयदीप पाटील, दीपक पोवार, माळवाडीचे यशवंत गायकवाडसह शिक्षक उपस्थित होते. के. वाय. पाटील यांनी सूत्रसंचालन, विकास कांबळे यांनी आभार मानले.