
यवलूज परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
यवलूज परिसरात गस्तीची मागणी
माजगाव : यवलूज (ता.पन्हाळा) येथे भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सोमवारी रात्री मोबाईल शॉपी फोडून ११ मोबाईल इतर वस्तूंसह २९०० रूपये असा ७० हजारांचे साहित्य लंपास केले. एका आठवड्यात चार ठिकाणी चोरीचे प्रकार झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पन्हाळा पोलिसांनी रात्री गस्त घालावी, अशी मागणी होत आहे. परिसरात चोरटे रात्री बंद घरे व दुकाने हेरून फोडत आहेत. या आठवड्यात अजय आडनाईक यांच्या बंद घरात चोरी केली. शुक्रवारी मध्यरात्री डॉ. पंडित मोरे यांचे नंदा क्लिनीक फोडून वीस हजार लांबविले तोवरच सोमवारी मध्यरात्री महेश चिले यांच्या वेदांत मोबाईल शॉपीला चोरट्यांनी लक्ष्य केले. ११ मोबाईलसह इतर वस्तू व २९०० रूपये असा ७० हजारांचा ऐवज लांबविला. पन्हाळा पोलिसांनी परिसरात रात्रीची गस्त घालावी, अशी मागणी होत आहे.