
अरुण सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी धनंजय पाटील
03068
धनंजय पाटील
03069
विजया चौगले
अरुण सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी धनंजय पाटील
माजगाव : येथील श्री अरुण विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी धनंजय आत्माराम पाटील, तर उपाध्यक्षपदी विजया बळवंत चौगले यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेचे संस्थापक कुंभी साखर कारखान्याचे माजी संचालक आनंदराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडी झाल्या. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी माधुरी कुंभार होत्या. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक ‘गोकुळ’ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण नरके व माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच कुंभी कारखान्याचे माजी संचालक आनंदराव माने यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली आहे. या वेळी नूतन संचालक हिंदुराव माने, अनिल चौगले, रंगराव चौगले, राजाराम दिंडे, सचिन पाटील, विलास मगदूम, आनंदा वडाम, संगीता पाटील, गणपती कुंभार उपस्थित होते. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बी. आर. वडाम, मोहन दिंडे, माजी सरपंच जे. के. पाटील, बी. टी. चौगले यांचे सहकार्य मिळाले. सचिव चंदर खोत यांनी आभार मानले.