Sat, Sept 30, 2023

माजगाव परिसरात ऊस भरणीची लगबग
माजगाव परिसरात ऊस भरणीची लगबग
Published on : 13 April 2023, 3:21 am
03131
माजगाव परिसरात ऊस भरणीची लगबग
माजगाव ः पन्हाळा तालुक्यातील माजगावसह पडळ, यवलूज, सातार्डे, खोतवाडी, शिंदेवाडी, देवठाणे आदी गावांत ऊस भरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली. कासारी नदीला बारमाही मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी प्रामुख्याने ऊसाचे पीक घेतात. बहुतांशी शेतकरी ८६०३२ ऊसाची लावण करतात. ऊस तीन ते चार महिन्यांचा झाल्यावर सरीतील उसाला पॉवर टिलर व बैलांच्या सहाय्याने मातीची भर लावली जाते. यामुळे ऊस जोमदार वाढतो. बैलांची संख्या लक्षणीय घटल्याने बहुतांशी शेतकरी पॉवर टिलरच्या सहाय्याने ऊसभरणी करतात. पिकांना जादा पाण्याची गरज भासत असताना भारनियमनामुळे पिकांना वेळेत पाणी मिळत नाही. तीव्र उन्हाळ्यात दुपारी शेतकरी शिवारात जात नाहीत. शेतकरी वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.