
कोतोलीत रविवारी कुस्त्यांचे जंगी मैदान
कोतोलीत उद्या कुस्त्यांचे मैदान
माजगाव ता.१९ : हनुमान यात्रा उत्सव कोतोली (ता.पन्हाळा) यांच्यावतीने स्थगित करण्यात आलेले कुस्त्यांचे जंगी मैदान रविवार (दि.२१) रोजी दुपारी ४ वाजता होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष सज्जन पाटील यांनी दिली आहे.
कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची दोन लाखाची कुस्ती पै.सिकंदर शेख व पै.भोला पंजाबी यांच्यामध्ये होणार असून, द्वितीय क्रमांकाची दिड लाखाची कुस्ती पै.नवीन कुमार व पै.माऊली जमदाडे यांच्यामध्ये होणार आहे.तृतीय क्रमांकाची एक लाखाची कुस्ती पै.समीर देसाई विरूद्ध संतोष दोरवड तसेच चौथ्या क्रमांकाची ७५ हजाराची कुस्ती पै.भगतसिंग खोत विरूद्ध पै.राम कांबळे यांच्यामध्ये होणार आहे. तर पाचव्या क्रमांकाची ३५ हजाराची कुस्ती पै. सानिकेत राऊत विरूद्ध पै.नामदेव केसरे यांच्यामध्ये होणार आहे. यावेळी महिलांच्या कुस्त्याही होणार असून, शंभरहून अधिक लहान मोठ्या चटकदार कुस्त्या होणार आहेत.