
शाहूवाडी तालुका आपत्ती व्यवस्थापन वार्तापत्र
लोगो- व पूर फोटो
--
महापुराचा लेखा-जोखा
शाहूवाडी तालुका
नागरी वस्तीचे कायमस्वरूपी पुनर्वसन गरजेचे
पूरग्रस्तांना ११ कोटींवर रकमेचे वाटप; अद्याप काही लाभार्थी मदतीपासून वंचित
शाम पाटील ः सकाळ वृत्तसेवा
शाहूवाडी, ता. १७ ः गतवर्षाच्या अतिवृष्टी व महापुराने शाहूवाडी तालुक्यात शेती, पिके व घरांची पडझड होऊन नुकसान झाले. अनेक संसार उघड्यावर पडले. दुभती जनावरे वाहून गेली. शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निवार सहाय्य योजनेतून नुकसानग्रस्त (शेतकरी, व्यापारी, पूरग्रस्त) २५ हजार ६४३ लाभार्थ्यांना ११ कोटी ४१ लाख २६ हजार ५०१ रुपयांचा सहाय्य अनुदान वाटप केले. मात्र, झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात शासकीय मदत अपुरी आहे. पूरग्रस्त क्षेत्रातील नागरी वस्तीचे पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना झालेली नाही. वापराविना पडून असलेल्या शासकीय जागांत कायमस्वरूपी पुनर्वसन होणे गरजेचे आहे.
जुलैमध्ये धुवाँधार पावसामुळे महापुराने धोक्याची पातळी ओलांडली. नदी काठच्या गावागावांत पाणी शिरले. त्यात सातशेहून अधिक घरांची पडझड झाली. १७ हजार ३३० शेतकऱ्यांच्या ऊस व भात पिकांचे तर २ हजार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे नुकसान झाले. दुभती जनावरे वाहून गेली. काही ठिकाणी बाजारपेठांत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.
२०१९ च्या पुरात युती सरकारने शेतकऱ्यांना प्रतिगुंठा ९५० रुपये प्रमाणे पीक नुकसानभरपाई दिली होती. आघाडी सरकारने केवळ १३५ रुपयांने भरपाई दिली आहे. पडलेल्या घराच्या नुकसानीपोटी त्यावेळी ३ लाख तर सध्या दीड लाख भरपाई दिली आहे. शिवाय अवघड निकषांमुळे अनेकजण भरपाईपासून वंचित आहेत. सरसकट नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आंदोलने, निवेदने, मागण्या झाल्या; पण त्याकडे शासनाने दुर्लक्षच केल्याचा सूर आहे. शासनाच्या प्रधानमंत्री अवास योजना, इंदिरा घरकुल आवास योजनांमधून वापराविना पडून असलेल्या शासकीय जागांत पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन गरजेचे आहे. तशा मागणीचे ठराव पूरग्रस्त गावांनी केले आहेत.
नुकसान असे - (अतिवृष्टी व महापूर)
---------------------
*शेतीचे एकूण नुकसान क्षेत्र - ४९२६ हेक्टर
*बागायती क्षेत्र - ३८४१ हेक्टर
*जिरायत क्षेत्र - १०८० हेक्टर
*फळपिके क्षेत्र - ५ हेक्टर
*नुकसानग्रस्त शेतकरी - १७ हजार ३३०
*वाटप मदत - ६ कोटी ५३ लाख ४५ हजार
*परत गेलेली रक्कम - ३३ लाख ३६ हजार
-------------------------
* एकण घरे पडझड - ७००
* वाटप अनुदान - १ कोटी ९६ लाख ९६ हजार
* परत गेलेली रक्कम - ८० लाख ७६ हजार
--
सानुग्रह अनुदान वाटप
* एकूण पूरग्रस्त - १४८१
*अनुदान वाटप - १ कोटी ४८ लाख १० हजार
* परत गेलेली रक्कम - ७६ लाख
-----------------
- भूसंख्खलन एकूण जमीन - २०७६
*भरपाई १ कोटी ९७ हजार
*परत गेलेली रक्कम - १३८८
--
दुकान/टपरी - ३८३
*भरपाई ३७ लाख १ हजार
*परत गेलेली रक्कम - निधी १ कोटी ९२ लाख ८८ हजार
--
मृत जनावरे १८
* भरपाई ४ लाख ७४ हजार ५००
* परत गेलेली रक्कम - १४५०
---
अतिवृष्टी व महापुराच्या नैसर्गिक आपत्तीवेळी तालुक्याची शासकीय यंत्रणा सतर्क असते. आवश्यक तातडीने मदत केली जाते. नुकसानभरपाईची मदत संबंधित लाभार्थींना पोहोच झाली आहे. गतवेळचा अनुभव लक्षात घेता, यावेळी अधिक दक्षता घेत आहोत. त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे.
- गुरू बिराजदार, तहसीलदार, शाहूवाडी.
Web Title: Todays Latest Marathi News Mlk22b01350 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..