
शाहूवाडीत पावसाची रिपरीप'' पिकांच्या वाळवणांचे नुकसान
धूळवाफ पेरणीला
शाहूवाडीत फटका
शाहूवाडी ः काल रात्रीपासून तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. शेतीच्या नांगरटीसह इतर मशागतीस पाऊस उपयुक्त ठरणारा असला तरी काढणी झालेल्या सूर्यफूल, भुईमूग, मका पिकांच्या वाळवणांचे नुकसान करणारा ठरला आहे.
गुरुवारी रात्री पाऊसाला सुरुवात झाली. अद्याप रिपरिप सुरूच आहे. माळरानांत मशागतीसाठी पाऊस थोडाफार फायद्याचा ठरणारा आहे. मात्र शेतकऱ्यांनी काढणी करून वळवणेसाठी उन्हात घातलेल्या सूर्यफूल, मका,भुईमूग पिकांचे भिजल्याने नुकसान झाले आहे. कलिंगड, काकडी पिकांचेही नुकसान झाले आहे. गवत, पिंजराच्या होळ्या, जळावू लाकूड, शेणी भिजल्याने नुकसान झाले आहे.
तुरुकवाडी : पावसामुळे खरीप हंगाम पेरणीपूर्वची मशागत कामे खोळंबली आहेत. तालुक्यात भात पीक धूळवाफ व रोपलावण पद्धतीने घेतले जाते. पावसाने हजेरी लावल्याने धूळवाफ पेरणी खोळंबण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतात पाणी व चिखलाचे साम्राज्य आहे. असाच पाऊस कोसळत राहिला तर खरीप हंगाम धोक्यात येणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mlk22b01359 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..