शाहूवाडी चोरटी शिकारप्रकरणी अणखी दोघेजण ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहूवाडी चोरटी शिकारप्रकरणी अणखी दोघेजण ताब्यात
शाहूवाडी चोरटी शिकारप्रकरणी अणखी दोघेजण ताब्यात

शाहूवाडी चोरटी शिकारप्रकरणी अणखी दोघेजण ताब्यात

sakal_logo
By

शिकार प्रकरणातील
आणखी दोघांना पकडले
शाहूवाडी, ता. २८ ः पिशवीपैकी खोतवाडी (ता. शाहूवाडी) येथे झालेल्या चोरट्या शिकार प्रकरणातील पसार झालेल्या आबाजी बाजीराव बोरगे व अमोल शिवाजी रवंदे (दोघेही, वरेवाडी, ता. शाहूवाडी) यांना आज वन विभागाने पकडल्याची माहिती मलकापूरचे परिक्षेत्र वनअधिकारी अमित भोसले यांनी दिली.
अधिक माहिती अशी, २६ मे रोजी रात्री उशिरा खोतवाडी येथील पठारावर पिसोरा व सशांची चोरटी शिकार करणाऱ्या पाच जणांना वन विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले होते. त्यावेळी आबाजी बोरगे व अमोल रवंदे दोघे पसार झाले होते. त्यांचा शोध वन विभाग घेत होता. आज हे दोघे गावच्या परिसरातच लपून बसल्याचे कळले. मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेऊन बोरगे व रवंदे यांना वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. आणखी कोण या प्रकरणात सामील आहेत का, याचा शोध घेण्याचे चालू असलेचे परिक्षेत्र अधिकारी भोसले यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mlk22b01368 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top