
शाहूवाडी - वाडीचरण येथे अपघात दुचाकीस्वराचा पाय तुटून रस्त्यात पडला .
मोटारीच्या धडकेने
तरुणाचा पाय तुटला
जखमी सागावचा; हुपरीतील मित्र जखमी
शाहूवाडी, ता. ६ ः बांबवडे कोकरूड मार्गावर वाडीचरण (ता. शाहूवाडी) येथे अनोळखी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत आकाश अशोक चोपडे (२६, रा. सागाव, ता. शिराळा, जि. सांगली) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. धडक एवढ्या जोरात दिली की आकाशचा उजवा पाय तुटून रस्त्यावर पडला होता. मागे बसलेला मयूर मंगेश कांबळे (रा. हुपरी, ता. हातकणंगले) हा किरकोळ जखमी झाला. आज दुपारी तीनच्या सुमारास अपघात झाला. बांबवडे पोलिस चौकीत अपघाताची नोंद झाली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सागाव येथील आकाश अशोक चोपडे मोटारसायकल (एमएच १० सीजे २३६०) वरून मित्र मयूर कांबळे याला घेऊन बांबवडेहून सागावला निघाला होता. त्यावेळी वाडीचरण येथील वळणावर भरधाव चारचाकीने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यावेळी वाहनाच्या चाकाखाली सापडून आकाश चोपडे याचा गुडघ्याखाली पाय तुटला. तुटलेला पाय वाहनाच्या चाकात अडकून सुमारे १५ फुटांवर जाऊन पडला होता. तुटलेल्या पायातून होणारा रक्तस्राव पाहून आकाश चोपडे जागेवर बेशुद्ध पडला. दुचाकीवर मागे बसलेला मयूर कांबळे रस्त्यावर आपटून जखमी झाला. १०८ रुग्णवाहिकेमधून जखमी दोन्ही तरुणांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तुटलेला पाय आणि पडलेला रक्ताचा सडा असे अपघातस्थळावरील भीषण दृश्य होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mlk22b01383 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..