पान ५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ५
पान ५

पान ५

sakal_logo
By

शाहूवाडी ग्रामस्थांचा
निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार
---------------------
नगरपंचायतीची मागणी; आरक्षण सोडत अधिकाऱ्यानींच पूर्ण केली

शाहूवाडी, ता. ७ ः शाहूवाडी या तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत व्हावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या आरक्षण सोडतीची येथील ग्रामसभा ग्रामस्थाविना झाली. केवळ औपचारिक्ता म्हणून सोडत कार्यक्रम उपस्थित आधिकाऱ्यांनीच पूर्ण केला. शाहूवाडी या तालुका ठिकाणी सध्या ग्रामपंचायत आहे.
शासनाने सर्व तालुका ठिकाणी नगरपंचायत करण्याची घोषणा मार्च २०१३ मध्ये केली. त्यानुसार ५ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन राजपत्रात येथे नगरपंचायतीस मंजुरी मिळाली आहे; मात्र अद्याप येथे ग्रामपंचायतच आहे. शासन निर्णयानुसार येथे नगरपंचायत व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत. १८ आक्टोबर २०२१ च्या ग्रामसभेत जोपर्यंत येथे नगरपंचायत होत नाही, तोपर्यंत सर्वच निवडणुकांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव केला आहे. नगरपंचायत होणे गरजेचे आहे. रस्ते, पाणी, गटर्स अशा मूलभूत सेवा सुविधांची येथे वानवा आहे. येथे नगरपंचायत झाल्यास पुरेसा निधी उपलब्ध होईल व विकास होईल. नगरपंचायत झालीच पाहिजे, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत ग्रामसभेविना झाली. नागरिकांना कळवूनही कोणी उपस्थित राहिले नाही.


कोट-
शाहूवाडी ग्रामस्थांची नगरपंचायतीसाठीची मागणी आहे. ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण सोडतीसाठीच्या ग्रामसभेस नागरिक उपस्थित राहिले नाहीत, मात्र आरक्षण सोडत कार्यक्रम नियमानुसार पूर्ण केला आहे. येथील माहिती वरिष्ठ कार्यालयास कळविली आहे .
- गुरू बिराजदार, तहसीलदार शाहूवाडी.

Web Title: Todays Latest Marathi News Mlk22b01386 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top