अपघातातील चालक वाहन बदलून दावा,पोलिसासह चौघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातातील चालक वाहन बदलून दावा,पोलिसासह चौघांना अटक
अपघातातील चालक वाहन बदलून दावा,पोलिसासह चौघांना अटक

अपघातातील चालक वाहन बदलून दावा,पोलिसासह चौघांना अटक

sakal_logo
By

३२४८५

बनावट चालक, वाहन दाखवून
भरपाई वसुलीचा प्रयत्न उघड
शाहूवाडीत प्रकार; पोलिस हवालदारांसह चौघांना अटक; सहा जणांवर गुन्हा
शाहूवाडी, ता. २८ ः अपघातातील चालक आणि वाहन बदलून नुकसान भरपाईचा दावा दाखल केल्याप्रकरणी पोलिस हवालदारासह सहा जणांवर शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. याप्रकरणी तत्कालीन पोलिस हवालदारासह चौघांना गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. तत्कालीन पोलिस हवालदार अशोक शिवाजी नवले (वय ४०), सुनील पांडुरंग यादव (३७, यादववाडी, शिरगाव शाहूवाडी) अशोक मारुती पाटील (४०, शिरगाव, शाहूवाडी), संजय दत्तू शिंदे (४०, लाळेवाडी, कडवे, शाहूवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पांडुरंग रामचंद्र यादव आणि अर्चना सुनील यादव (यादववाडी, शिरगाव, शाहूवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या अन्य दोघांची नावे असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी दिली.
गुन्हे अन्वेषण शाखेने दिलेली माहिती अशी, शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोपार्डे येथे जून २०१६ मध्ये जीप आणि मोटारसायकलचा अपघात झाला होता. यात संशयित पांडुरंग यादव आणि अर्चना यादव जखमी झाले होते. अपघाताचा तपास तत्कालीन पोलिस हवालदार अशोक नवले यांनी केला. पांडुरंग यादव यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आणि मोटारसायकलचा विमाही नव्हता. त्यांची चौकशी अंमलदार नवले यांच्याशी संगणमत करून अपघातातील मोटारसायकल व चालक बदलला. संशयित संजय शिंदे याची विमा असलेली मोटारसायकल आणि मोटारसायकलस्वार म्हणून संशयित अशोक पाटील यांना दाखविले. या संदर्भात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. दरम्यान, संशयित पांडुरंग आणि त्यांची सून अर्चना यादव यांनी भरपाई मिळावी म्हणून विमा कंपनीसह इतरांवर जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता.
दरम्यान, विमा कंपनीस संशय आल्याने त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे जनहित याचिका दाखल केली. त्यानुसार न्यायमूर्तींनी गुन्हे अन्वेषण विभागाला चौकशीचे आदेश दिले. चौकशीत मोटारसायकल व चालक बदलल्याचे पुढे आले. त्यानुसार पोलिस निरीक्षक वर्षा गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित नवलेंसह सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अटक केलेल्या चौघांना पाच दिवस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास अधीक्षक डॉ. बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भाग्यश्री पाटील करीत आहेत.

५० हजार स्वीकारले
अपघातातील प्राथमिक नुकसान भरपाई म्हणून पांडूरंग यादव व अर्चना यादव यांनी अपघात दावे प्राधिकरणकडून प्रत्येकी २५ हजार रुपये धनादेशाद्वारे स्वीकारले आहेत. अशा प्रकारे खोट्या व बनावट माहिती देऊन न्यायालय व टाटा कंपनीची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mlk22b01390 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top