
शाहूवाडी - मानोली येथील खून प्रकरणातील आरोपी अटक
गोकुळ शिरगावातील
संशयित महिलेला अटक
महिलेचा खून करून मृतदेह टाकला मानोलीत
शाहूवाडी, ता. ३० ः मानोली (ता. शाहूवाडी) येथे पत्र्याच्या पेटीत अनोळखी महिलेचा मृतदेह २० मार्च २०२२ ला पोलिसांना आढळला होता. महिलेचा खून सविता राजू निरलगे (३०, रा. गोकुळ शिरगाव दत्त कॉलनी हिने आपल्या साथीदारांच्या मदतीने गळा आवळून केल्याचे आज पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीस शाहूवाडी पोलिसांनी अटक केले आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, २० मार्चला मानोलीच्या हद्दीत आंबा- विशाळगड रस्त्यालगत झुडपात पेटीत २० ते २५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. तोंडात ओढणीने बोळा कोंबला होता. गळ्याभोवती पांढरट रंगाची ओढणी गुंडाळलेली होती. डाव्या हातावर प्रवीण असे गोंदलेले होते. मृत महिला कोल्हापूर येथील व्हिनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, रेल्वे स्टेशन, पद्मा टॉकीज या परिसरात देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र नेमकी माहिती मिळालेली नाही. मृत महिला गिऱ्हाईकांना आकर्षित करते या रागातून सविता राजू नरलगे हिने साथीदाराच्या मदतीने हा खून करून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पत्र्याच्या पेटीत बंद करून मानोली गावाच्या हद्दीतील जंगलात टाकून दिला. अधिक तपास पोलिस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mlk22b01392 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..