टुडे ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ३
टुडे ३

टुडे ३

sakal_logo
By

‘हर घर तिरंगा’ उपक्रमाला
शाहूवाडी तालुक्यात प्रतिसाद

शाहूवाडी ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज तालुक्यात गावोगावी घराघरांवर राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकवून नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी माजी सैनिक, वीर पत्नी, विधवा पत्नी, आदर्श विद्यार्थी, ज्‍येष्ठ नागरिक यांच्या हस्ते ध्‍वजवंदन झाले, तहसील कार्यालयासमोर वीर पत्नी लक्ष्मी आलेकर (पणुंद्रे ) यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. पंचायत समिती, पोलिस ठाणे, मलकापूर नगरपालिका आदी शासकीय कार्यालयांतही उत्साहात अमृतमहोत्सव उपक्रमाची सुरुवात झाली. मलकापूर नगरपालिकेसमोर वीर पत्नी शोभा पाटील, मोळवडे ग्रामपंचायतीसमोर प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी विद्यार्थिनी अमृता खोपडे हिच्या हस्ते ध्वजवंदन झाले. अमृतमहोत्सवानिमित्त प्रभातफेरी, खाऊवाटप, रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mlk22b01414 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..