कागल ४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल ४
कागल ४

कागल ४

sakal_logo
By

प्रत्येकाला कायद्याचे
ज्ञान आवश्यक ः न्या. अमोल शिंदे
मलकापूर, ता. १ ः चांगला माणूस निर्माण होण्यासाठी प्रत्येकाला कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे, असे प्रतिपादन शाहूवाडी येथील दिवाणी न्यायाधीश अमोल शिंदे यांनी केले.
येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात वाणिज्य विभाग व बार असोसिएशन शाहूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम झाला. अँटी रॅगिंग लॉट्राफिक रुल डे या विषयावर ते बोलत होते. ॲड. खटावकर यांनी ट्रॅफिक रुल या विषयावर माहिती दिली. ते म्हणाले, ‘कायद्याचे अज्ञान नुकसान करणारे असते. निष्काळजीपणे व हलगर्जीपणे वाहने चालवू नयेत.’
ट्रॅफिकचे नियम जाणून वाहने चालवली पाहिजेत. ॲड. एस. के. साळुंखे यांनी अँटी रॅगिंग या विषयावर मत व्यक्त केले.
यावेळी डॉ. झुंजार माने म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी शिकणे आवश्यक आहे. प्राचार्य डॉ. टी. एन. घोलप म्हणाले, ‘निकोप दृष्टी असेल, तर मनुष्य पुढे जाऊ शकतो. आजच्या तरुणाने अमली पदार्थांपासून दूर राहून आपला विकास साधला पाहिजे. विद्यार्थ्यांना ट्रॅफिकचे रूल माहीत असणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे प्रा. सचिन चव्हाण यांनी भीत्तिपत्रिकेचे आयोजन केले होते.
प्रा. एस. एस. फडतरे, प्रा. राजेंद्र सुतार, डॉ. एस. के. खोत, रुपेश गोसावी व टी. एस. डोंगरे उपस्थित होते. प्रा. एन. एम. पाटील यांनी स्वागत केले. उपप्राचार्य डॉ. नामदेव आडनाईक यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mlk22b01426 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..