मलकापूरात चतुर्थ वार्षिक कर आकारणी २०२६ पर्यंत जैसे थे मंजूरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलकापूरात चतुर्थ वार्षिक कर आकारणी २०२६ पर्यंत जैसे थे मंजूरी
मलकापूरात चतुर्थ वार्षिक कर आकारणी २०२६ पर्यंत जैसे थे मंजूरी

मलकापूरात चतुर्थ वार्षिक कर आकारणी २०२६ पर्यंत जैसे थे मंजूरी

sakal_logo
By

मलकापूरला करवाढ नाही
मलकापूर, ता. १६ ः येथील मिळकतींच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीत २०२६ अखेर करवाढ करू नये, असे सहाय्यक संचालक नगररचना, कोल्हापूर यांनी पालिकेला लेखी पत्राद्वारे कळविले आहे. आमदार विनय कोरे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. २०१९ व २०२० मधील गंभीर पूरस्थिती, कोरोना महामारी व मलकापूर नागरी कृती समितीने २०१९ मध्ये वाढीव कराविरोधात केलेले गाव बंद आंदोलन या पाश्र्वभूमीवर व जिल्ह्यातील अन्य समतुल्य पालिकेतील मिळतींचा करवाढ पाहता येथील पालिकेची २०१७ ते २०२१ या कालावधीत करवाढ अधिकच आहे. यावेळी पुन्हा येथे चतुर्थ वार्षिक करवाढ करु नये, यासाठी आमदार कोरे यांनी नगररचना विभागास पत्र देऊन कळविले होते. येथील पालिका सभागृहाने २५ ऑगस्ट २०२१ रोजीच्या सभेत चतुर्थ वार्षिक करवाढ करू नये, असा ठरावही केला होता. त्यामूळे पालिका प्रशासनाने करवाढ नसलेला प्रस्ताव नगररचना कार्यालयास पाठविला होता. त्यास अनुसरून नगररचना विभागाने पालिकेस २०२६ अखेर करवाढ न करणेस मंजुरी दिली.