गोगवे ( ता.शाहूवाडी ) येथील भांडणातील महिलेचा आज मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोगवे ( ता.शाहूवाडी ) येथील भांडणातील महिलेचा आज मृत्यू
गोगवे ( ता.शाहूवाडी ) येथील भांडणातील महिलेचा आज मृत्यू

गोगवे ( ता.शाहूवाडी ) येथील भांडणातील महिलेचा आज मृत्यू

sakal_logo
By

भांडणात जखमी झालेल्या
गोगवेतील महिलेचा मृत्यू
शाहूवाडी, ता. ६ : गोगवे (ता. शाहूवाडी) येथील शालन पाटील यांचा आज मृत्यू झाला. घराच्या भिंत बांधकामावरून २४ ऑक्टोबर रोजी त्यांचे शेजाऱ्यांशी भांडण झाले होते. त्यावेळी झालेल्या दगडफेकीत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. कोल्हापूर येथे रुग्णालयात उपचार घेत असताना आज त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणामधील सर्व आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी पाटील कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, २४ ऑक्टोबर रोजी भिंतीच्या बांधकामावरून शालन पाटील व शेजारी यांच्यात वाद झाला. त्यातून दगडफेक झाली. त्यात शालन पाटील यांच्या डोक्याला दगड लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मारामारीबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये किरण पाटील, मच्छिंद्र पाटील, संगीता पाटील, गौरव पाटील या चौघांविरोधात तक्रार दाखल झाली होती. यापैकी किरणवर पोलिसांनी कारवाई केली आहे.