शाहूवाडीत मोर्चा काढले बाबत माजी आमदारासह तिनसे जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहूवाडीत मोर्चा काढले बाबत माजी आमदारासह तिनसे जणांवर गुन्हा
शाहूवाडीत मोर्चा काढले बाबत माजी आमदारासह तिनसे जणांवर गुन्हा

शाहूवाडीत मोर्चा काढले बाबत माजी आमदारासह तिनसे जणांवर गुन्हा

sakal_logo
By

आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी
सत्यजित पाटील यांच्यासह ३०० जणांवर गुन्हा
शाहूवाडी, ता. ११ ः ग्रामपंचायत निवडणुकीच्या सार्वत्रिक आचारसंहितेचे व तालुका कार्यकारी न्यायदंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना मोर्चा काढल्याप्रकरणी माजी आमदार सत्यजित पाटील व जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड यांच्यासह ३०० जणांवर आज येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची तक्रार मलकापूरचे मंडल अधिकारी संदेश कदम यांनी पोलिसांत दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी ः गायरानांमधील अतिक्रमणे काढण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. त्याविरोधात ही अतिक्रमणे काढू नयेत, यासाठी माजी आमदार सत्यजित पाटील व रणवीर गायकवाड यांनी आज लोकांना एकत्रित करून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. विनापरवाना, संगनमताने व बेकायदेशीरपणे जमाव एकत्र करून घोषणाबाजी केली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे व तालुका कार्यकारी न्यायदंडाधिकारी यांच्या लेखी आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणी माजी आमदार सत्यजित पाटील, जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, तालुकाप्रमुख दत्तात्रय पोवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हंबीरराव पाटील, विजय बोरगे, माजी पंचायत समितीचे माजी सदस्य विजय खोत, पांडुरंग पाटील, दिलीप पाटील, जालंदर पाटील यांच्यासह ३०० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे अधिक तपास करीत आहेत.