मलकापूर येथे जीपची पलटी आठजण गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलकापूर येथे जीपची पलटी आठजण गंभीर जखमी
मलकापूर येथे जीपची पलटी आठजण गंभीर जखमी

मलकापूर येथे जीपची पलटी आठजण गंभीर जखमी

sakal_logo
By

मलकापूर येथे वडाप जीप
उलटून आठ जण जखमी
शाहूवाडी, ता.१९ : मलकापूर येथे अवैध प्रवासी वहातूक करणारी जीप उलटून झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले. यापैकी चार जण गंभीर जखमी असून, ते कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
शिलाबाई मोरे (वय ५५,टेकोली), अशोक लोखंडे (वय ६०,पणुंद्रे), श्रीकांत जंगम (वय २६, कासार्डे), गंगूबाई लोखंडे (वय ७०, पणुंद्रे), अनुसया लोखंडे (वय ५५, पणुंद्रे), साहिल जंगम (वय १८, कासार्डे), दत्तू पाटील (वय ६५, टेकोली), बेबीताई पाटील (वय ६०, टेकोली) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मलकापूरहून प्रवाशी घेऊन जीप (एम.एच.११ ई १६०७) शाहूवाडीच्या दिशेने चालली होती. त्यावेळी आरटीओची गाडी समोरून येत असल्याचे समजल्याने जीपचालक गडबडीने जीप परतू लाला असताना जीप उलटली. यामध्ये जीपमधील प्रवासी जखमी झाले. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय कोल्हापूर येथे पाठवण्यात आले.